Job 27

1नंतर ईयोब ने आपले बोलणे पुढे चालू ठेवले आणि म्हणाला,

2“जसे देव जीवंत आहे, तो माझ्याबाबतीत अन्यायी होता,
त्या सर्वशक्तीमान देवाने माझ्या जीवाला दु:ख दिले आहे,
3जोपर्यंत माझ्यात जीव आहे
आणि देवाचा जिवंत श्वास माझ्या नाकात आहे तोपर्यंत,

4माझे ओठ वाईट गोष्टी बोलणार नाहीत

आणि माझी जीभ खोटे सांगणार नाही.
5तुम्ही बरोबर आहात हेही मी कधी मान्य करणार नाही.
मी निरपराध आहे हेच मी मरेपर्यंत सांगत राहीन.

6मी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांना मी चिकटून राहीन.

चांगले वागणे मी कधीही सोडणार नाही. मरेपर्यंत माझे मन मला कधीही खाणार नाही.
7माझे शत्रू दुष्टासारखे होवो,
अनितीमान मणुष्यासारखे ते माझ्यावर उठो.


8कारण देवविरहीत राहणाऱ्यांना देव जीवनातून छेदतो तर त्यांची आशा काय आहे,

त्याचा जीव त्याने काढून घेतला म्हणजे त्याला आशा काय आहे?
9देव त्याची आरोळी ऐकेल काय?
जेव्हा त्याच्यावर संकटे येतील,
10तो सर्वशक्तीमानाच्या ठायी आनंद मानेल काय?
आणि तो देवाला सर्वदा हाक मारेल काय?

11मी तुम्हाला देवाच्या हाताविषयी शिकविल,

सर्वशक्तीमानाच्या योजना मी तुमच्यापासून लपवणार नाही.
12पाहा, तुम्ही सर्वांनी हे पाहिले आहे,
मग तुम्ही असे निरर्थक का बोलता?


13देवाने वाईट लोकांसाठी हीच योजना आखली होती.

आणि सर्वशक्तीमानाकडून जुलम्यास हेच वतन मिळते.
14त्याला खूप मुले असतील परंतु त्याची मुले तलवारीने मरतील,
दुष्ट माणसाच्या मुलांना पुरेसे खायला मिळणार नाही.

15राहीलेली सर्व मुले साथीने मरतील,

आणि त्याच्या विधवा विलाप करणार नाहीत.
16दुष्ट माणसाला इतकी चांदी मिळेल की ती त्याला मातीमोल वाटेल, त्याला इतके कपडे मिळतील की ते त्याला मातीच्या ढिगाप्रमाणे वाटतील.
17जरी तो कपडे करील ते धार्मिक अंगावर घालतील,
निर्दोष त्याची चांदी त्यांच्यामध्ये वाटून घेतील.

18तो त्याचे घर कोळ्यासारखे बांधतो,

रखवालदाराने बांधलेल्या झोपडीसारखे ते असते.
19तो श्रीमंत स्थितीत अंग टाकतो,
परंतू सर्वदा असे राहणार नाही,
तो उघडून बघेल तेव्हा सर्व गेलेले असेल.

20भय त्याला पाण्याप्रमाणे घेवून जाईल,

वादळ त्याला रात्री घेवून जाईल.
21पूर्वेचा वारा त्याला वाहून नेईल आणि तो जाईल
वादळ त्याला त्याच्या घरातून उडवून लावेल.

22तो त्याला फेकून देईल आणि थांबणार नाही,

तो त्याच्या हातातून निसटून जाण्याचा प्रयत्न करील.
तेव्हा लोक टाळ्या वाजवतील आणि त्याची थट्टा करतील,
त्याच्या ठिकाणातून त्याला पळवून लावतील.”
23

Copyright information for MarULB